मुख्यमंत्र्यांनी आता ज्योतिषाचे काम करावे – पृथ्वीराज चव्हाण

0
531

पुणे, दि. ३१ (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता ज्योतिषाचे काम करावे, असा खोचक सल्ला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी  आज (शनिवार)  पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिला.

लोकसभा निवडणुकापासून प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला मुख्यमंत्र्यासह भाजपाचा छुपा पाठिंबा होताच. आता आगामी विधानसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीचाच विरोधी पक्ष नेता असेल असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. यावर चव्हाण यांनी निशाणा साधला.

चव्हाण म्हणाले की, देशभरात जे विरोधक भाजपमध्ये येणार नाहीत, त्यांना  चौकशी  करण्याची भीती दाखवून  धमकी दिली जात आहे.  फक्त राष्ट्रवादीच्याच नेत्यांना नाही,  तर काँग्रेसच्या नेत्यांनाही अशाचप्रकारे धमक्या देऊन भाजपमध्ये  घेतले जात आहे,  असाही आरोप चव्हाण यांनी यावेळी केला.