मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याला लाभलेले गॉड गिफ्ट – गोपीचंद पडळकर

0
496

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर लढलो, मात्र धनगर आरक्षणासाठी मी पक्षातून बाहेर पडून आंदोलन केली. कारण ज्या प्रमाणे पोरग रडल्यावर आई जेवायला देते त्या प्रमाणे आंदोलन केल्यानंतर सरकारने आमच्या मागण्या रीतसर पूर्ण केल्या. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्याला लाभलेले गॉड गिफ्ट आहे. त्यांच्या कामावर खुश होऊन मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे, अशा शब्दांत धनगर नेते गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने उधळली.

मुंबईच्या गरवारे क्लब येथे गोपीचंद पडळकर यांनी आज (सोमवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

पडळकर म्हणाले की, भाजपात पहिल्यापासून कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. २०१४ पूर्वी या राज्याची परिस्थिती खूप वाईट होती. कोणी वाली भेटेल की नाही, असे वाटत होते. मुख्यमंत्री फडणवीस राज्याच्या विकासाचे काम करत आहे. तर चंद्रकांत पाटील तळागाळात काम करत आहेत. धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून काम केले. महाड ते मुंबई रॅली काढली. आता सरकारने धनगर समाजाच्या पाठिशी उभे राहावे, असे पडळकर म्हणाले.