मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींचा दणका; चंद्राबाबूंचा अलिशान बंगला पाडला  

0
551

हैदराबाद, दि. २६ (पीसीबी) – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांच्या आदेशानुसार माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा ‘प्रजा वेदिका’हा अलिशान बंगला  जमिनदोस्त करण्यात आला.   आतापर्यंत या इमारतीत चंद्राबाबू राहत होते.

चंद्राबाबूंनी मुख्यमंत्री रेड्डी यांनी पत्र लिहून ही इमारत पाडू नये व या इमारतीस विरोधी पक्ष नेत्याचे शासकीय निवासस्थान म्हणून घोषित करण्यात यावी, अशी मागणी केली होती.  दरम्यान, शनिवारी रेड्डी सरकारने नायडू राहत असलेली ही इमारत ताब्यात घेतली. सोमवारी जगनमोहन रेड्डींनी या इमारतीत जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन  ही इमारत पाडण्याचा  निर्णय घोषित केला होता.

प्रजा वेदिका ही इमारत तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी नियमांचे उल्लंघन करुन बांधली होती. त्यामुळे या अवैध इमारतीविरोधात कारवाई करुन अवैध बांधकामांविरोधातील अभियान राबवले जाईल, असे जगनमोहन रेड्डी म्हणाले.  दरम्यान, तेलगू देसम पार्टीने ही सूड बुद्धीने केलेली कारवाई आहे,  असे म्हटले आहे.  सरकारने माजी मुख्यमंत्र्याबद्दल जरा देखील आदर दाखवला नाही, असेही म्हटले आहे.