मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग गुरुवारी राहणार ४० मिनिटांसाठी बंद

0
948

पुणे, दि. ५ (पीसीबी) – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गुरुवार (दि.६) सूचना फलक लावण्यात येणार आहेत. यामुळे मुंबईहून पुण्याकडे येणारा द्रुतगती मार्ग दुपारी १२ ते १ या वेळेत बंद राहणार आहे.

हा बंद फक्त गुरुवारी तो एकदाच चाळीस मिनिटांसाठी राहील, अशी माहिती एमएसआरडीसीने दिली आहे. यामुळे द्रुतगतीवरील वाहतूक जुन्या पुणे-मुंबई महामार्गाकडे वळवली जाणार आहे. गुरुवारी केवळ मुंबई-पुणे मार्गावरील, तर गणेशोत्सवानंतर पुणे-मुंबई मार्गावर असाच ब्लॉक घेऊन, सूचना फलक बसवले जाणार आहेत.