मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग गुरुवारी दोन तास बंद

0
745

पुणे, दि. ३० (पीसीबी) – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग गुरुवारी (दि.३१) दुपारी १२ ते २ या वेळेक बंद राहणार आहे. माहिती देणारा इलेक्ट्रॉनिक फलक लावण्याचे काम केले जाणार असल्याने हा बंद ठेवण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, मुंबई -पुणे द्रुतगती महार्गावर सध्यस्थिती समजावी, घाट परिसरात वाहतूक कोंडी आहे की नाही, याची वाहनचालकांना अगोदरच कल्पना मिळावी यासाठी मार्गाची माहिती देणारा इलेक्ट्रॉनिक फलक लावण्याचे काम सध्या सुरु आहे. हा फलक लावण्यासाठी मुंबईहून पुण्याकडे येणारा महामार्ग २ तास बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत वाहनचालकांनी कळंबोली सर्कल, उरण बायपास रोड, टी पॉर्इंट, पळस्पे फाटा, कोन, कोन ब्रीज व तेथून महामार्गावर यावे किंवा कळंबोली सर्कल, खांदा कॉलनी सिग्नल, पनवेल ओव्हर ब्रीज व तेथून महामार्गावर वळावे असे महामार्ग प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.