पर्रिकर म्हणतात राफेल करारात मोदींनी खेळ केला; राहुल गांधींचा गौप्यस्फोट

0
855

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) –  माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचा राफेल करारात काहीच सहभाग नव्हता, असे त्यांनीच आपल्याला सांगितले. तसेच अनिल अंबानी यांना फायदा मिळवून देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी हा संपूर्ण खेळ रचल्याचेही त्यांनी सांगितले, असा दावा काँग्रेस अध्यक्ष  राहुल गांधी यांनी केला आहे.

राहुल गांधी गोव्याला विश्रांती घेण्यासाठी गेले असून मंगळवारी त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांची   विधानभवनातील त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली होती.  त्यानंतर त्यांनी केरळच्या कोच्चीमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना  मार्गदर्शन करताना राफेल करारावरून मोदींवर पुन्हा  एकदा तोफ डागली.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मला सांगितले की, नव्या राफेल खरेदी व्यवहाराशी  माझा काहीही संबंध नाही. पंतप्रधान  मोदींनी अनिल अंबानीला फायदा मिळवून देण्यासाठी हा सर्व खेळ केल्याचे त्यांनी मला सांगितले.