मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नव्हते, आणि आताही नाही – पंकजा मुंडे

0
367

औरंगाबाद,  दि. १० (पीसीबी) –  मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत २०१४ मध्येही नव्हते आणि आताही नाही, असे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.  औरंगाबादामध्ये  पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारने केलेल्या विकास कामांची माहिती दिली, यावेळ त्या बोलत होत्या.

सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्यात काही कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे  मुख्यमंत्री अशा घोषणा दिल्या होत्या. यावर मुंडे यांनी यावेळी खुलासा करताना सांगितले की, गेल्या १५ वर्षापासून मी राजकारणात आहे. मी भाजपची सर्व प्रथा, परंपरा नियम आणि शिस्त मला अवगत आहे. यामुळे आमच्या निर्णय प्रक्रियेत कोणाच्या मनात काही प्रश्न नव्हते. यामुळे अशा गोष्टी करून भाजपमध्ये कुठली पदे मिळत नाही. हे मला कळते.

मी संघर्ष यात्रा काढली त्यावेळी चाळीसगावच्या सभेत विनोद तावडे यांनी पंकजाताई एवढी लोकप्रिय आहे. की त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनू शकतात, असे म्हटले होते.  तेव्हा पासून हे मला विशेषन चिकटले.  त्यानंतर मीडिया आणि व लोकांनी  घोषणेतून पुढे आणले. मी मग मी कधीही ते बोलले नाही, असे पंकजा यांनी स्पष्ट केले.