मी खासदारकीचा राजीनामा देणार नाही – नारायण राणे

0
501

मुंबई, दि, ३० (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील जनतेला विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. तसेच सगळेच पक्ष मोर्चेबांधणी करण्यात व्यस्त आहेत. अशातच महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे हे येणाऱ्या निवडणुकीत स्वतंत्र लढणार अस चित्र दिसत आहे.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते स्वतंत्र लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणि एनडीएमधील भाजपचा घटकपक्ष शिवसेना यांच्या विरोधामुळे नारायण राणे खासदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती परंतु राणे यांनी या वृत्ताचे खांदा केले आहे. नारायण राणे यांनी ज्यावेळेस काँग्रेस सोडली त्यानंतर ते भाजपात जातील अशी चर्चा होती. परंतु त्यांच्या प्रवेशाला शिवसेनेनी विरोध केला होता. त्यामुळे नारायण राणे नाराज झाले होते. त्यानंतर त्यांनी भाजपात न जाता महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली आणि ते एनडीएचा घटकपक्ष झाले.

दरम्यान, नारायण राणे यंदाची विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. याची घोषणा त्यांचे पुत्र  नितेश राणे यांनी केली आहे. तसेच २०१४ च्या निवडणुकीत पराभव झालेल्या कुडाळ-मालवण मतदारसंघातूनच नाराणय राणे पुन्हा निवडणूक लढवणार आहेत.