पिंपळे गुरव येथील तरुणाचे अपहरण करुन महिलेसोबत करायला लावले अश्लिल चाळे

0
1227

चिंचवड, दि. ३० (पीसीबी) – कारमधून आलेल्या तिघा जणांच्या टोळीने एका तरुणाचे अपहरण केले. त्यानंतर जिवे मारण्याची धमकी देऊन कारमधील एका महिलेसोबत चुंबन घ्यायला लावले. तसेच या प्रकाराचे फोटो आणि व्हिडीओ रेकॉर्ड करुन अज्ञात इसमाला पाठवले. ही घटना शुक्रवारी (दि. २६) सकाळी साडेआठ ते दहाच्या दरम्यान औंध हॉस्पीटल मेन गेटकडून सांगवीकडे जाणाऱ्या रस्त्यावर चालत्या कारमध्ये घडली.

याप्रकरणी प्रविण बाबी मेस्त्री (वय ३२, रा. रामनगर, गल्ली क्र. २, जी.व्ही. खरमाटे यांच्या खोलीत, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तीन अज्ञात इसम आणि एका अनोळखी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या एक्सेन्ट कारमधून आलेल्या तिघा जणांनी मिळून प्रविण याचे अपहरण केले. त्यानंतर जिवेमारण्याची धमकी देऊन कारमधील महिलेचे चुंबन घेण्यास भाग पाडले. तसेच या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ रॅकॉर्ड करुन अज्ञात आरोपीला पाठवले. घटनेनंतर प्रविण हा प्रचंड घाबरला होता. यामुळे त्याने सोमवारी (दि. २९) सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक जी. डी. माने तपास करत आहेत.