“मी काशिफ खानला ओळखत नाही. त्याने मला पार्टीसाठी…”

0
190

मुंबई, दि.०८ (पीसीबी) : मी काशिफ खानला ओळखत नाही. त्याने मला पार्टीसाठी निमंत्रण दिलं होतं. पण मी पार्टीला गेलो नाही. क्रुझवरील पार्टीची मला काहीच माहिती नव्हती. त्या पार्टीच्या माध्यमातून काही षडयंत्र रचण्याचा डाव होता की नाही हे मला माहीत नाही. त्याचा तपास एजन्सीने करावं, असा खुलासा पालकमंत्री अस्लम शेख यांनी केला.

पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काशिफ खानच्या आमंत्रणावर प्रतिक्रिया व्यक्त केली. मी काशिफ खान नावाच्या व्यक्तीला ओळखत नाही. त्याला मी कधीच भेटलो नाही. त्याने मला पार्टीला बोलावलं होतं. मी पालकमंत्री आहे. त्यामुळे अनेक लोक लग्न सोहळे, वाढदिवसाला मला बोलवत असतात. त्याचप्रमाणे मला या पार्टीचंही आमंत्रण होतं. या प्रकरणात षडयंत्र होतं की नाही याचा एजन्सी तपास करत आहे, असं अस्लम शेख म्हणाले. काशिफ खानकडे माझा नंबर आहे की नाही मला माहीत नाही. माझा मोबाईल पीएकडे असतो. तो एका ठिकाणी मला भेटला होता. तो तिथे कसा आला मला माहीत नाही. त्याने मला भेटून पार्टीचं निमंत्रण दिलं होतं. आता त्या पार्टीत काय होणार होतं. मला माहीत नाही. हे तपास यंत्रणेने शोधावं. काशिफशी फोनवर संभाष झालं नाही. संभाषण झाल्याचं मला आठवत नाही. त्याने भेटून आमंत्रण दिलं होतं हे मात्र नक्की, असं त्यांनी सांगितलं.

दिवसभरात मला 50 लोक मला आमंत्रित करतात. एखाद्या लग्नात गेलो तर लोकं वाढदिवसाचंही निमंत्रण देत असतात. मी ज्या कार्यक्रमात जातो. त्याची माहिती घेत असतो. जिथे जातच नाही, त्याची माहिती घेत नाही. मला वाटतं ज्या कार्यक्रमाला जायचं नाही त्याची माहिती घेणंही योग्य नाही, असंही त्यांनी सांगितलं. ही केस जशी चालली. सुरुवातीला हे ड्रग्ज प्रकरण वाटत होतं. शाहरुख खानच्या मुलाचं नाव आल्यानंतर मीडियाने त्याचं कव्हरेज सुरू केलं. त्याचवेळी गुजरातमध्ये 20 हजार कोटीचं ड्रग्ज पकडलं त्यावर चर्चा झाली नाही, याकडेही त्यांनी मीडियाचं लक्ष वेधलं. एका मुलाला नशामुक्ती केंद्रात पाठवायला हवं होतं की नाही हे तपासायला हवं होतं. मीडियानेही तपास करायला हवा होता, असंही ते म्हणाले.