मिरवणुकीत ट्रक घुसल्याने दोन वर्षीय बालकासह तिघेजण ठार

0
432

कर्नाटक, दि.१० (पीसीबी) – र्गामाता विसर्जन मिरवणुकीत ट्रक घुसल्याने दोन वर्षीय बालकासह तिघेजण जागीच ठार झाले तर दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. हि घटना कागवाड (ता. अथणी, कर्नाटक)  येथे गणेशवाडी रस्त्यावर बुधवारी रात्री घडली.

संजय रावसाहेब पाटील (वय ३०), सचिन पाटील-जुगळे (वय ३२, दोघेही रा. कागवाड) व अभिलाष गुळापनावर (वय २, रा. इंगळगाव, ता. अथणी) अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कागवाड येथे नवरात्रोत्सवानंतर बुधवारी रात्री दुर्गामाता मूर्तीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत परिसरातील सुमारे पन्नासहून अधिक ग्रामस्थ सहभागी झाले होते. पाटील मळ्यापासून ही मिरवणूक गणेशवाडी येथे कृष्णा नदीकडे जात होती. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कागवाड हुन गणेशवाडी कडे जाणारा १८ चाकी ट्रक या मिरवणुकीत घुसला. यामुळे ग्रामस्थ ट्रकखाली चिरडले गेले. ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले. राजश्री पाटील व अभिषेक मालगावे (वय २५, दोघेही रा. कागवाड) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. जखमींना मिरज येथील रुग्णालयात हलविण्यात आले.