मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म  – राकेश मुटरेजा

0
1726

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – मानवता हाच केवळ एक सर्व श्रेष्ठ धर्म आहे आणि या धर्माचे पालन आम्ही सर्वांनी केले तर समाजामध्ये असलेली विषमता, उच्च-निचता, वेगवेळ्या कारणांनी निर्माण झालेले भेदभाव संपुष्टात येतील, असे प्रतिपादन दिल्ली युवा प्रचारक  राकेश मुटरेजा यांनी केले. संत निरंकारी चेरिटेबलच्या वतीने काळेवाडी येथील संत निरंकारी सत्संग भवन येथे रविवार (दि. ३०) युवकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आयोजित विशाल आध्यात्मिक इंग्लिश माध्यम सत्संग सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी पुणे झोन मधून भोसरी,पुणे,आळेफाटा, नानगाव, पिंपरी-चिंचवड, दौंड, आव्हाळवाडी येथून युवक हजारोंच्या संख्येने उपस्थित झाले होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ताराचंद करमचंदानी यांनी केले तर गिरधारीलाल मतनानी यांनी आभार मानले.

पुढे बोलताना ते म्हणाले, सदगुरु हा मानवाला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाण्याचे कार्य करीत असतो. सदगुरुकडून ब्रह्मज्ञान मिळाल्यानंतर त्या ब्रह्मज्ञानाचा वापर आपण दैनंदिन जीवनात जगताना करायला हवा असा संदेश त्यांनी दिला. तसेच, मनुष्य सुखीसमाधानाने जीवन जगू शकेल. हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा प्रत्येक माणसाला एका ईश्वराची जाणकारी होईल. आज मानवीय नितीमुल्यापासून  माणूस भरकटत चालला आहे, अशा वेळी आजच्या उच्चशिक्षित युवापिढीला आध्यात्माची जोड मिळाली तर नक्कीच तो कधी वाईट मार्गाला जाणार नाही. एक सुजाण नागरिक बनवण्याची क्षमता केवळ आध्यात्मिक विचारांमध्ये आहे म्हणून आजच्या युवकाला आध्यात्मिक सत्संग सोबत जोडणे फार गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.