मानवता ध्येयवादी सामाजिक संस्थेच्या वतीने महिला सफाई कामगारांचा सत्कार

0
486

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आकुर्डी येथील  मानवता ध्येयवादी सामाजिक  संस्थेच्या वतीने प्रभाग क्रमांक १४ दत्तवाडी येथे पिंपरी महापालिकेच्या महिला सफाई कामगारांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी खासदार अमर साबळे, प्राधिकारणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, उमा खापरे, नगरसेवक प्रमोद कुटे, माऊली थोरात, राजेश पिल्ले, संजय मंगळवेढेकर, राजू दुर्गे, कैलास कुटे, मानवता ध्येयवादी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप  गोसावी, तुकाराम बिराजदार, दयानंद कांबळे, प्रकाश महाडिक, उध्दव गोसावी, पांडुरंग परकाळे आदी सह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ऊर्मिला काळभोर यांनी मनोगत व्यक्त केले. दिलीप गोसावी यांनी प्रास्ताविक केले. योगेश भागवत यांनी आभार मानले.