माझ्यावर अन्याय होत राहिला तर मला वेगळा विचार करावा लागेल – एकनाथ खडसे

0
705

मुंबई,दि.८(पीसीबी) – भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी ‘माझ्यावर अन्याय होत राहिला तर मला वेगळा विचार करावा लागेल’ असं वक्तव्य माध्यमांशी बोलताना केलं आहे. ते जळगावमध्ये माध्यमांशी बोलत होते.

माझा पक्ष सोडण्याचा विचार नसला तरी जाणीवपूर्वक काही लोकांकडून माझा अपमान करण्याचा प्रयत्न होत आहे. काही व्यक्ती जाणीवपूर्वक अपमान करत आहेत. त्यामुळे त्याची नोंद मला घ्यावी लागेल. शेवटी मी माणूस आहे, देव नाही. मलाही भावना आहेत, असं एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे.

मला आता कोअर ग्रुपमधून काढून टाकण्यात आलं आहे. अशा प्रत्येक ठिकाणी अन्यायाने वागणूक होत असेल जाणीवपूर्वक मला दूर ठेवत असतील तर मी काय करावे, असा प्रश्नही खडसेंनी महाराष्ट्रातील जनतेला विचारला.