“माझा भाऊ मुका आहे त्याला का मारलं ?” असं विचारलं म्हणून भावाला सुद्धा केली मारहाण

0
312

खेड, दि. ३० (पीसीबी) – मुक्या भावाला मारहाण केल्याचा जाब विचारणा-या भावाला एकाने शिवीगाळ करत लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. तसेच भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या महिलेला शिवीगाळ केली. ही घटना रविवारी (दि. 29) रात्री नऊ वाजता खेड तालुक्यातील गोलेगाव येथे घडली.

राजेंद्र बाळकृष्ण चौधरी ((वय 32, रा. गोलेगाव, ता. खेड) यांनी याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोमनाथ दत्तात्रय चौधरी (रा. गोलेगाव, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ याने फिर्यादी यांचा मुका भाऊ गणेश याला मारहाण केली. त्याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी सोमनाथ याच्याकडे गेले असता त्याने फिर्यादी यांना हाताने चापट मारून शिवीगाळ, दमदाटी केली. जीवे मारण्याची धमकी देत लोखंडी रॉडने डोक्यात मारून डाव्या हाताच्या बोटाला चावा घेऊन गंभीर दुखापत केली. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी यांच्या पत्नी आल्या असता ओरपीने त्यांनाही शिवीगाळ केली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.