माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न प्रदान

0
451

दिल्ली, दि. ८ (पीसीबी) – माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न देऊन गौरवण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख आणि ज्येष्ठ संगीतकार भूपेन हजारिका यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. दरम्यान, या पुरस्कारासाठी जानेवारी महिन्यात प्रणव मुखर्जी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती.