‘माजी’ झाल्यामुळे आता कोणी इंडियन आयडॉलला उभही करणार नाही,वरूण सरदेसाईचा अमृता फडणवीसांना जोरदार टोला

0
511

मुंबई,दि.२३(पीसीबी) –  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर रविवारी ट्विट टीका केली होती. अमृता फडणवीस यांनी या ट्विटमध्ये ‘फक्त आडनाव ठाकरे असून चालत नाही’ अशी बोचरी टीका मुख्यमंत्री करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.

अमृता फडणवीसांच्या ‘त्या’ ट्वीटला शिवसेनेचे युवा नेते वरूण सरदेसाईंनी अमृता फडणवीसांच्या ट्विटला रिट्वीट करून  शिवसेनेचे युवा नेते वरूण सरदेसाईंनी यांनी बोचरी टीका केली आहे. ‘मराठी बिग बॉस चे ऑडिशन वगैरे सुरु आहेत काय? ‘माजी’ झाल्यामुळे आता कोणी इंडियन आयडॉल ला उभं पण करणार नाही नसल्याचं म्हटलं आहे. बाकी बिग बॉस साठी चालू देत जोरदार…,’ असे ट्विट करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.