माजी खासदार जयाप्रदा विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याने खासदार आजम खान यांना समन्स

0
432

लखनऊ, दि. ६ (पीसीबी) – सपाचे खासदार आजम खान यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजप उमेदवार आणि माजी खासदार जयाप्रदा यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले होते.

जयाप्रदा यांनी आझम खान यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. हे वादग्रस्त वक्तव्य आजम खान यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. गुरुवारी न्यायालयाने त्यांचे अंतरिम जामिन फेटाळून लावला आहे.

आजम खान हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखले जातात. यामुळे ते नेहमीच अडचणीत येत असतात. लोकसभा निवडणुकी दरम्यानही त्यांनी असेच वक्तव्य करत खळबळ उडवली. यावर निवडणूक आयोगाने दखल घेत त्यांच्यावर ७२ तास प्रचार करण्यास बंदी घालण्यात आली होती.

दरम्यान, हे प्रकरण न्यायालयात असून आता पोलिसांनी हे समन्स खासदार आजम खान यांच्या घरावर चिटकवले आहे. त्यांना ११ सप्टेंबरपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.