महाविकास आघाडीत कसलीही धुसफूस नाही; आम्ही सर्वजण मुख्यमंत्र्यांसोबत- अजित पवार

0
482

मुंबई,दि.२३(पीसीबी) – महाविकास आघाडी ही अभेद्य आहे. आम्ही सर्वजण मुख्यमंत्र्यांसोबत आहोत. राज्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. त्यामुळे आमच्यात कसलीही धुसफूस आहे, असं समजू नये, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याला(सीएए) समर्थन दर्शवलं आहे. या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत धुसफूस असल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. यावर अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. ते बारामतीत पत्रकारांशी बोलत होते.

दरम्यान, महाविकास आघाडी ही तीन पक्षांतील वरिष्ठांच्या विचाराने चालणारी आहे. राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. त्यामुळे ही आघाडी तुटणारी नाही, असंही ते म्हणाले आहेत.