महाविकास आघाडीचं खातेवाटप जाहीर

0
751

मुंबई,दि.१२(पीसीबी) – महाविकास आघाडीचं खातेवाटप अखेर आज जाहीर झाले आहे. शिवसेनेच्या वाट्याला गृह आणि नगरविकास खातं देण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. तर सुभाष देसाई यांच्याकडे उद्योग, उच्च तंत्र शिक्षण या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

छगन भुजबळ यांना ग्रामविकास, जलसंपदा, सामाजिक न्याय या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर जयंत पाटील यांच्याकडे अर्थ नियोजन, गृहनिर्माण आणि सार्वजनिक आरोग्य या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. नितीन राऊत यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम तर बाळासाहेब थोरात महसूल, उर्जा खातं सोपवण्यात आलं आहे.