महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट राज्यस्तरीय अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेत पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट महिला संघाला तृतीय क्रमांक

0
360

महाराष्ट्र, दि.२७ (पीसीबी) : महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 5 वी खुला गट राज्य अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेत पिंपरी चिंचवड महिलांच्या संघाने तृतीय क्रमांक पटकवला .

महिलांच्या कर्णधार अमिषा पाटीलच्या मार्गदर्शनाखाली संघाने तृतीय क्रमांक मिळवला आहे . अमिषा पाटील , माधुरी बनसोडे , अचला गावडे , श्वेता साळूंखे ह्यांनी उत्कृष्ट अशी फलंदाजी केली आहे .अनुजा मोरे , संचिता सोनावणे ह्यांनी छान गोलंदाजी केली .तसेच श्रद्धा आव्हाड , मधुरा बाफना , साक्षी महाजन , साक्षी सरदार , सिया सूर्यवंशी ह्यानी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले . या सर्व खेळाडूंना डॉ डी वाय पाटील पब्लिक स्कूलच्या क्रीडा शिक्षिका पार्वती बाकळे ह्यांचे मार्गदर्शन लाभले.

महाराष्ट्रातील मुलींच्या 8 संघानी या राज्य स्पर्धेत भाग घेतला होता. तसेच पिंपरी चिंचवड मुलींच्या संघाने नाशिक , सिंधुदुर्ग ग्रामीण , सिंधुदुर्ग शहर या सर्व जिल्हांना हरवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे .या सर्व स्पर्धा 24 सप्टेंबर 2021 ते 26 सप्टेंबर 2021 रोजी तालुका क्रीडा संकुल , नाशिक येथे संपन्न झाल्या .
पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी मृदुला महाजन , तुषार हिंगे ,सुनीता फडके , ऐश्वर्या साठे ह्यांनी यशश्वी खेळाडूंचे अभिनंदन करून  पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. या सर्व स्पर्धा महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट महासचिव मीनाक्षी गिरी ह्यांच्या देखरेखेखाली संपन्न झाल्या .