महापालिकेत सत्तेसाठी तयारीला लागा – संजोग वाघेरे

0
753

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – पिंपरी चिंचवडकरांनी भाजपला मोठ्या अपेक्षेने सत्ता दिली, पण त्यात सर्वांचा भ्रमनिरास झाला. आता राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली विकास कामे आजही लोकांच्या लक्षात आहेत, त्याच कामाची पावती म्हणून लोक पुन्हा राष्ट्रवादीला सत्तेत आणायच्या मूडमध्ये आहेत. राज्यात आपलीच सत्ता आहे, आता २०२२ मध्ये महापालिकेत पुन्हा नव्या दमाने राष्ट्रवादीच सत्तेत येईल, त्यासाठी कामाला लागा असे आवाहन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त खराळवाडी येथील कार्यालया आवारात आयोजित ध्वजवंदन वाघेरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक दत्ता साने, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, ज्येष्ठ नेते पंडित गवळी, विजय लोखंडे, फजल शेख, प्रदीप गायकवाड, वर्षा गायकवाड, माजी नगरसेवक अरुण बोराडे, सतीश दरेकर, राजेंद्र साळुंखे, मनोज सुतार, उत्तम अल्लाट, कैलास देवरे, सुदाम शिंदे, कविता खराडे, शशिकांत निकाळजे, किरण देशमुख, अभिजीत अल्लाट, विशाल घोगरे, संपत पाचुंदकर, अरूणा कुंभार, सविता खराडे, संगीता कोकणे, प्रकाश सोमवंशी यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.