महायुतीत रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षाला ६ जागा

0
515

मुंबई, दि. २ (पीसीबी) – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षाला महायुतीत ६ जागा सोडण्यात आल्या आहेत. त्यापैकी आठवलेंनी चार जागांवरील उमेदवारांची घोषणा केली आहे. रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणे मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघातून आणि रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दीपक निकाळजे फलटणमधून संधी देण्यात आली  आहे.

रामदास आठवले यांनी महायुतीकडे दहा जागांची मागणी केली होती. मात्र त्यांना केवळ सहाच जागांवर बोळवण करण्यात आली आहे. महायुतीत साताऱ्यातील फलटण, सोलापुरातील माळशिरस, भंडारा, नांदेडमधील नायगाव, परभणीतील पाथरी आणि मानखुर्द शिवाजीनगरची जागा सोडण्यात आली आहे.

मानखुर्दमधून गौतम सोनावणे, फलटणमधून दीपक निकाळजे. पाथरी मोहन फड आणि नायगावमधून राजेश पवार लढणार आहेत. दरम्यान, आठवले यांचे हे सहाही उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढणार आहेत,  असे सांगितले जात आहे.