मराठी सिनेसृष्टीतला ‘तारा’ निखळला; ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे दीर्घ आजाराने निधन

0
894

मुंबई, दि. २४ (पीसीबी) –  मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात उपचारादरम्यान वयाच्या  ६३ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मलवली झाले. मोरूची मावशी या नाटकात त्यांनी अतिशय ताकदीने स्त्री पात्र रंगवलेले होते, हे पात्र प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिले. त्यांच्या चित्रपट, नाटकातील अनेक भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले. ते गेल्या कित्येक दिवसांपासून आजारी होते. दरम्यानच्या काळात त्यांची तब्येत चांगलीच सुधारली होती. परंतु , बुधवारी प्रकृती खालवल्यामुळे त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.