मराठा उद्योजक लॉबी आयोजित राज्यव्यापी महारक्तदान सोहळ्यास प्रचंड प्रतिसाद…

0
295

पिंपरी,दि.२९(पीसीबी) – संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुकास्तरावर एकूण २७ ठिकाणी शिबीरांचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये हजारो बांधवांनी रक्तदान केले. संस्थापक श्री. विनोदभाऊ बढे, कार्याध्यक्ष स्वप्नीलभाऊ काळे व कोअर कमिटीच्या निर्णयानुसार पुणे ॲडमीन श्री. केडी उर्फ कुलदीप पाटीलसर यांनी जिल्ह्यात २ ठिकाणी पुणे शहरामध्ये हडपसरला व ग्रामीणमध्ये मंचर, आंबेगाव येथे रक्तदान शिबीराचे नियोजन करण्यात आले.

पुणे शहर व जिल्हा येथे अवघ्या दोनच दिवसाच्या तयारीनंतर 78+ बॕगट रक्त संकलित करण्यात आले. या नियोजनात प्रामुख्याने चिंतेश्वरभाऊ देवरे, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख श्री. उदयभाऊ भक्ते व श्री वैभवभाऊ फरतडे, MUL पुणे टीम (शहर व ग्रामीण), MUL मिडीया, कॕल्सी उद्योगसमूहाच्या कल्याणीताई, नोबेल हॉस्पिटलचे वाळूंजसर, मंचर मधील विनोदभाऊ तसेच सिटी हॉस्पिटल, मंचर. कॕल्सी_उद्योगसमूह, पुणे AR Labdor, पुणे MUL आंबेगाव टीम, पुणे ब्लड बँक टीम यातील सर्व कर्मचारीवर्गाने सहकार्य केले.