मराठा आरक्षण देण्यास राज्य सरकार ठाम; विरोधकांनी अडथळा आणू नये – मुख्यमंत्री

0
721

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – मराठा समाजाला  आरक्षण देण्यास राज्य सरकार  ठाम आहे. त्यामुळे यामध्ये विरोधकांनी अडथळा निर्माण करू नये, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत गटनेत्यांसोबतची बैठक कोणत्याही तोडग्याविना संपली. तर दुसरीकडे आरक्षणाचा अहवाल मांडावा, या भूमिकेवर विरोधक ठाम आहेत. तर पुढील रणनिती ठरवण्यासाठी विधिमंडळात विरोधक आमदारांची बैठक घेण्यात आली. 

मराठा आरक्षणाबाबतचे विधेयक गुरुवारी (दि.२९) विधानसभा आणि विधानपरिषदेत मांडण्यात येणार आहे. परंतु विरोधकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. अहवाल सादर न करताच विधेयक मांडण्याला त्यांनी विरोध दर्शवला होता. तसेच सभागृहात गोंधळ घालत जोपर्यंत अहवाल सादर होत नाही, तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही, असा पवित्रा विरोधकांनी घेतला आहे.

सरकारने आरक्षणाबाबतचा मागासवर्ग आयोगाचा अहवाल सभागृहात मांडण्यासाठी विरोधकांनी  आक्रमक भूमिका घेतली आहे. मागासवर्ग आयोगाच्या अहवालात एकूण ५२ टक्के आरक्षणाला आणि ओबीसींच्या प्रवर्गाला धक्का न लागता मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देण्याबाबत सूचना केली आहे. त्यानुसार विधेयकाचे प्रारुप ठरवले जाणार आहे.