सुविधा न पुरवल्याने चाकण येथील बांधकाम व्यवसायीकासह जमीन मालकांवर गुन्हा

0
1234

चाकण, दि. २७ (पीसीबी) – पाणी, लिफ्ट, कचरा संकलन आणि वेळेत फ्लॅटचा ताबा न दिल्याच्या कारणावरुन चाकण-शिक्रापुर रस्त्यावरील तुलीप होम्स या सोसायटीच्या बांधकाम व्यवसायीकासह जमीन मालकांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सदाशीव गोखले (वय ४२, रा. मुंबई) यांनी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, यश इंटरप्रायजेस आणि आकाश ग्रुपच्या बांधकाम व्यवसायीकासह जमिन मालक झाकीरउल्ला चौधरी, अरजानभाई पटेल, सतीश पटेल, विनोद पटेल, दिलीपकुमार पटेल, नरेंद्रभाई पटेल,  रमेशभाई पटेल, निकुंजकुमार पटेल, सुरेशभाई पटेल, विक्री प्रतिनिधी सतीश रिंधे, मार्केटींग मॅनेजर राकेश गायकवाड आणि तणवर शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण-शिक्रापुर रस्त्यावर तुलीप होम्स नावाची रहवासी घरे बनवण्याची साईट २०१४ पासून सुरु आहे. यामध्ये फिर्यादी गोखले यांनी २०१४ मध्ये ५० लाख रुपये देऊन दोन फ्लॅट खरेदी केले होते. मात्र बांधकाम व्यवसायीकाने पाणी, लिफ्ट, कचरा संकलन या व्यवस्था पुरवल्या नाही. सध्या तुलीप सोसायटीमध्ये ८० कुटूंब राहण्यासाठी आले आहेत. त्यांना सुविधांचे आश्वासन देऊन न पुरवल्याने तेथील नागरिकांची ताराबळ उडाली आहे. तसेच अद्याप देखील नागरिकांनी घेतलेले फ्लॅट त्यांच्या नावावर करण्यात आलेले नाहीत. यामुळे तुलीप होम्स या सोसायटचे बांधकाम व्यवसायीक यश इंटरप्रायजेस आणि आकाश ग्रुपच्या मालकांवर, जमिन मालकांवर, विक्री प्रतिनिधी आणि मार्केटींग मॅनेजर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.