“मराठवाडा मुक्ती संग्राम कार्यक्रमास मुख्यमंत्री यांची अनुपस्थिती म्हणजे देशभक्ती का?”

0
266

मुंबई, दि.१७(पीसीबी) : गेली अनेक वर्षे एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाला गैरहजेरी लावल्याने शिवसेनेनं जलील यांच्यावर टीकाही केली होती. यावरून त्यांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचं वावडं आहे आणि ते स्वत:ला निजामाचे वारसदार समजतात असं म्हणत त्यांच्यावर निशाणाही साधला गेला होता. परंतु या वर्षी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील गैरहजर होते. त्यांनी मुंबईहून ऑनलाइन पद्धतीनं या कार्यक्रमाला उपस्थितीत दर्शवली. मुख्यमंत्र्यांच्या गैरहझेरीवर आता जलील यांनी निशाणा साधत टीका केली आहे.

जलील यांनी यावर प्रश्न करत, “मराठवाडा मुक्ती संग्राम कार्यक्रमास माझी अनुपस्थिती म्हणजे राष्ट्रविरोधी आणि शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची अनुपस्थिती म्हणजे देशभक्ती का ? आता निष्ठेचे प्रमाणपत्र देणारे आणि मीडिया गप्प का आहे ?,” अशी टीका केली आहे. पुढे जलील असेही म्हणाले कि, “शिवसेनाप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम कार्यक्रमास येण्यास स्पष्ट नकार दिला. मराठवाड्याबद्दल माझ्या सचोटी आणि निष्ठेवर प्रश्न विचारणारे मुख्यमंत्र्यांना का विचारत नाही?, यालाच मी दुहेरी मापदंड म्हणतो,” असंही ते म्हणाले.

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईतून ऑनलाइन पद्धतीनं उपस्थित होते. यावेळी त्यांनी जनतेशी संवाद साधला. याशिवाय भविष्यात मराठवाडा दुष्काळग्रस्त होऊ नये म्हणून खबरदारी घेतली असल्याचंही ते म्हणाले यावेळी त्यांनी सांगितलं.