मतदानावर प्रश्न; पत्रकारावर अक्षय कुमार खवळला

0
495

मुंबई, दि. २ (पीसीबी) – लोकसभेच्या रणधुमाळीत अनेक बॉलिवूडकरांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. परंतु, या सगळ्यापासून अभिनेता अक्षय कुमार मात्र लांबच होता. देशाच्या राजकारणाविषयी भूमिका घेत ट्विट करणाऱ्या अक्षयने निवडणुकीत मतदान का केले नाही असा प्रश्न त्याला अलीकडेच एका पत्रकाराने विचारला. परंतु, बॉलिवूडचा ‘खिलाडी’ कुमार त्याला विचारलेला हा प्रश्न मात्र फारसा खिलाडू वृत्तीने घेताना दिसला नाही. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

अक्षय कुमार ब्लँक चित्रपटाच्या स्क्रीनिंगला गेला असताना त्याला पत्रकारांनी वेगवेगळ्या विषयावर प्रश्न विचारले. त्यात, एका पत्रकाराने मतदानाचा विषय काढला. ‘देशातली जनता तुझ्यावर प्रचंड प्रेम करते, परंतु, तुला ट्रोलही केले गेले. तू मतदान करताना दिसला नाहीस’ पत्रकाराचा प्रश्न संपण्याच्या आतच अक्षयने ‘चलिए, बेटा…चलिए’ म्हणत पत्रकाराला गप्प केले आणि तिथून काढता पाय घेतला. मतदान न केल्याने ट्रोल होणारा अक्षय या व्हिडिओमुळे टीकेचे लक्ष्य होतोय.