भोसरी, देहूरोड, चाकणमध्ये वाहनचो-या; तीन दुचाकी चोरीला

0
267

भोसरी, दि. २० (पीसीबी) – भोसरी, देहूरोड आणि चाकण मधून तीन दुचाकी चोरीला गेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. याप्रकरणी बुधवारी (दि. 19) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अभिषेक बाळू कदम (वय 21, रा. भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कदम यांची 90 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी कदम यांच्या घराच्या पार्किंगमधून चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 17) रात्री साडेनऊ ते मंगळवारी (दि. 18) सकाळी सात वाजताच्या कालावधीत घडली.

गणपत बबन पिंगळे (वय 31, रा. देहूगाव) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी पिंगळे यांची 30 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी पिंगळे यांच्या सोसायटीच्या पार्किंग मधून चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 19) मध्यरात्री एक वाजता घडली.

चैतन्य बाळू राऊत (वय 26, रा. चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्यांनी राऊत यांची 30 हजार रुपये किमतीची दुचाकी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमधून चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 17) रात्री साडेआठ ते मंगळवारी (दि. 18) सकाळी अकरा वाजताच्या कालावधीत घडली