भोसरी एमआयडीसी येथे भाऊजीने केला अल्पवयीन मेहुणीवर लैंगिक अत्याचार

0
3834

भोसरी, दि. २० (पीसीबी) – जीवेमारण्याची धमकी देत एका १५ वर्षीय अल्पवयीन मेहुणीवर तिच्या मोठ्या बहिणीच्या पतीने (भाऊजीने) लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भोसरी एमआयडीसी येथे घडली.

याप्रकरणी १५ वर्षीय पिडितेच्या मोठ्या बहिणीने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपी टेकराज व्दारका ओढ (रा. अर्जुन इंजिनिअरींग कंपनी समोरील झोपडपट्टी, एमआयडीसी, भोसरी) याच्यावर पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करुण अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी पिडित १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आजारी असल्या कारणाने औषधोउपचार घेण्यासाठी भोसरी एमआयडीसी येथील तिच्या मोठ्या बहिणीच्या घरी आली होती. यावेळी तिचा भाऊजी आरोपी टेकराज याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यावर मोठ्या बहिणीचा संसार उद्वस्थ होईल या कारणाने घाबरलेली मुलगी पुन्हा गावाला निघून गेली. दोन वर्षांनंतर पिडित मुलगी पुन्हा तिच्या बहिणीच्या घरी आली. यावेळी देखील नराधम भाऊजीने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरडा ओरड केल्याने पिडितेची मोठी बहिण तिथे आली आणि सर्व प्रकार समोर आला. या दरम्यान आरोपी टेकराज फरार झाला होता. दोघी बहिणी घाबरल्या होत्या. तसेच त्या मुळच्या नेपाळच्या असल्या कारणामुळे त्यांना हिंदी आणि मराठी येत नव्हते. त्यांनी श्रीष्टी सोशल फाऊंडेशन आणि पॉवर ऑफ युनिटी सोशल फाउंडेशनच्या ललीता टिकाराम सोनार यांच्याशी संपर्क साधला आणि सर्व प्रकार सांगितला. यावर सोनार यांनी पिडित मुलगी आणि तिच्या बहिणीसह भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन भाषांतर करत प्रकरण पोलिसांना समजवून सांगितले. यामुळे आरोपीला बेड्या ठोकण्यात मदत झाली. भोसरी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.