भोसरीत मुलीची छेड काढल्याच्या रागातून मुलाच्या आई-वडिलांना लोखंडी रॉडने मारहाण

0
585

भोसरी, दि. ३ (पीसीबी) – मुलीची छेड काढल्याच्या रागातून मुलीच्या वडिलांनी मुलाच्या आई-वडिलांना लोखंडी रॉडने जबर मारहाण करुन जखमी केले. ही घटना मंगळवार (दि.२) सकाळी पावनेआठच्या सुमारास भोसरी गव्हाणे वस्तीतील आदिनाथनगरमध्ये घडली.

याप्रकरणी मुलाच्या ४२ वर्षीय आईने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मुलीचे वडिल अजय शर्मा (वय ४२, रा. बालाजी निवास, आदिनाथनगर, भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी पावनेआठच्या सुमारास फिर्यादी ४२ वर्षीय महिलेच्या मुलाने आरोपी अजय शर्मा यांच्या मुलीची छेड काढल्याच्या रागातून अजय यांनी फिर्यादी महिला आणि त्यांच्या पतीला लोखंडी रॉडने जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी अजय विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक तलवाडे तपास करत आहेत.