भारताचा ८ राखून न्यूझीलंडवर विजय; मालिकेत १-० आघाडी    

0
596

नेपियर ,  दि. २३ (पीसीबी) – भारताचा आक्रमक सलामी फलंदाज  शिखर धवनच्या नाबाद ७५  धावांच्या जोरावर भारतीय संघाने नेपियरमधील पहिल्या वनडे सामन्यात न्यूझीलंडचा ८ गडी राखून  दणदणीत पराभव केला.  या विजयामुळे  ५ सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० ने आघाडी घेतली आहे.

न्यूझीलंडकडून कर्णधार विल्यम्सनने सर्वाधिक ६४ धावा केल्या. तर रोस टेलरने ३४ धावा केल्या. न्यूझीलंडचा संघ १५७ धावांवर सर्वबाद झाला. कुलदीप यादवने सर्वाधिक ४ गडी बाद केले. मोहम्मद शामीने ३ तर चहलने २ आणि केदार जाधवने १ गडी बाद केला.  भारतीय संघाला फलंदाजी करताना प्रखर सूर्यप्रकाशाचा  त्रास सोसावा  लागला. १०.१ षटकानंतर सामना काही वेळासाठी थांबवावा लागला. त्यामुळे भारताला ४९ षटकात १५६ धावांचे आव्हान मिळाले.

कर्णधार विराट कोहलीने ४५ धावा  चेपल्या. दुसऱ्या गड्यासाठी शिखर धवन आणि विराट कोहली या जोडीने ९१ धावांची भागीदारी केली. १०३ चेंडूचा सामना करताना शिखर धवनने ६ चौकार ठोकले.  न्यूझीलंडने दिलेले आव्हान भारतीय संघाने ३४.५ षटकातच दोन गड्यांच्या बदल्यात  पार केले.  ५ सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने १-० ने अशी आघाडी घेतली आहे.