भाड्याने घेतलेले डंपर परस्पर विकून मालकाची फसवणूक

0
215

वाकड, दि. ६ (पीसीबी) – भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी घेतलेल्या दोन डंपरची एकाने मालकाच्या परस्पर विक्री केली. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 2018 ते 5 फेब्रुवारी 2022 या कालावधीमध्ये विनोदे वस्ती, वाकड येथे घडली.

सुनील श्‍याम बारणे (वय 31, रा. थेरगाव, पुणे) यांनी शनिवारी (दि.5) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अब्दुल कादिर सय्यद (रा. हडपसर, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2018 मध्ये आरोपी अब्दुल कादिर सय्यद याने फिर्यादी बारणे आणि त्यांचा एजंट मित्र या दोघांचे दोन डंपर भाडेतत्वावर चालवून देतो, असे म्हणून घेतले. त्यानंतर फिर्यादी यांच्या संमतीशिवाय काहीही न सांगता या डंपरची परस्पर विक्री केली. 2021 पासून बॅंकेचे हप्ते न भरता फसवणूक करून डंपरचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पोलीस उपनिरीक्षक एस जे कदम तपास करीत आहेत