पीएमपीएमएल बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

0
326

पिंपरी दि. ६ (पीसीबी) -पीएमपीएमएल बसच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना गांधीनगर, पिंपरी येथे शुक्रवारी (दि. 4) सायंकाळी घडली.

राहुल नाना उजागरे (वय 35, रा. गांधीनगर, पिंपरी) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पीएमपीएमएल बस क्रमांक (एम एच 12 / आर एन 6180) या बसवरील चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत राहुल यांचा भाऊ स्वप्नील नाना उजागरे (वय 30, रा. करमाळा, सोलापूर) यांनी शनिवारी (दि. 15) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत राहुल हे शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास गांधीनगर येथून पायी चालले होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या बसने राहुल यांना जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या राहुल यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. पोलीस उपनिरीक्षक अक्षय कोकाटे तपास करीत आहेत.