भाजप युवती आघाडी कार्यकारिणीत निवड झालेल्यांना आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप

0
680

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पक्ष युवती आघाडीच्या कार्यकारिणीत निवड झालेल्या युवतींना पक्षाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देण्यात आली.

यावेळी युवती आघाडीच्या शहराध्यक्षा तेजस्विनी कदम उपस्थित होत्या. युवती आघाडीच्या शहर उपाध्यक्षपदी दिघीतील सुप्रिया दिलपक, चिटणीसपदी वाल्हेकरवाडी येथील प्रियांका जाधव-काटकर, कार्यकारिणी सदस्यपदी वाल्हेकरवाडी येथील सारिका परदेशी, आकुर्डी, दत्तवाडी येथील निशा गुप्ता आणि भोसरी, लांडेवाडी येथील मोक्षदा गायकवाड, आकुर्डी गावठाणातील आरती बोंबे, निगडी, रुपीनगर येथील रोशनी गुरूंग यांची निवड करण्यात आली आहे.