भाजप पुणे जिल्हाध्यक्षपदी गणेश भेगडे यांची निवड

0
954

चिंचवड, दि. २९ (पीसीबी) – भाजप पुणे जिल्हाध्यक्षपदी गणेश भेगडे यांची निवड करण्यात आली. भाजपचे राज्य सरचिटणीस सुरेश हळवणकर यांनी  निवडीची आज (सोमवार)  घोषणा केली.

पिंपरी-चिंचवड  परिसरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आज चिंचवड, वाल्हेकरवाडीतील  आहेर मंगल कार्यालयात पार पडली.  यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

भेगडे यांनी यापूर्वी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी काम केले आहे. ते पुनर्वसन मंत्री बाळा भेगडे यांचे विश्वासू मानले जातात. भेगडे मावळमधील पाचवे शहराध्यक्ष आहेत.

दरम्यान,  भेगडे   सह्याद्री इंग्लिश स्कूल आणि विश्वनाथ भेगडे पतसंस्थेचे संस्थापक आहेत. भेगडे तालीम मित्र मंडळाचे पदाधिकारी असून त्यांनी यापूर्वी भाजपच्या जिल्हा प्रभारीपदी काम केले आहे.  त्यांच्या निवडीसाठी  मंत्री  बाळा भेगडे यांचे सहकार्य लाभले.