भाजपा सरकारमुळे लोकशाहीवरचा जनतेचा विश्वास दृढ झाला- अमित शाह

0
467

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – भाजपाने केलेला प्रचार हा सर्वाधिक मोठा आणि कार्यकर्त्यांची प्रचंड मेहनत असलेला प्रचार होता. मोदी सरकार पुन्हा यावे यासाठी भाजपाच नाही तर जनताही प्रयत्नशील आहे ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. भाजपाने आत्तापर्यंत खूप चांगली कामे केली आहे. २०१४ मध्ये देशाच्या जनतेने आम्हाला बहुमत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. देशाची जनतेने तो प्रयोग केला होता. त्याला आम्ही नरेंद्र मोदी प्रयोग असे म्हणतात. त्यामुळे आम्ही तेव्हाच ठरवले होता की २०१९ लाही असाच प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. भाजपाचे कार्यकर्ते आणि आम्हा सगळ्यांसाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पत्रकार परिषदेला हजर आहेत ही आनंदाची बाब ठरते आहे.

आमची पाच वर्षे संपत आली आहेत, नरेंद्र मोदी प्रयोग लोकांनी, देशाने स्वीकारला. यावेळीही बहुमताने आम्ही निवडून येऊ असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला. भाजपाने दिल्लीत प्रचाराच्या तोफा थंडावण्याच्या आधी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत अमित शाह बोलत होते. नरेंद्र मोदी सरकारने दर १५ दिवसांनी एक नवी योजना आणली. याचा सरासरी आकडा १३३ योजनांपर्यंत पोहचला आहे. देशातले गरीब, शेतकरी, महिला, आदिवासी या सगळ्यांपर्यंत या योजना पोहचल्या आहेत. आमच्या सरकारमुळे लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास दृढ झाला.

२०१४ मध्ये आमच्याकडे ६ राज्यांची सत्ता होती. आता आमच्याकडे १९ राज्यांची सत्ता आहे. कारण आम्ही विकासाला महत्त्व दिले. गरीबांचे, सामान्यांचे रहाणीमान कसे उंचावेल यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केले. आज पूर्ण जगभरात भारताचा डंका वाजू लागला आहे तो फक्त या सरकारने केलेल्या कामांमुळेच. देशात असुरक्षिततेची भावना नाही ही लोकांची भावना आहे हेच आमचे यश आहे असे आम्ही मानतो असेही अमित शाह म्हटले आहेत.