भाजपा अनुसूचित जाती मोर्चा पिंपरी-दापोडी मंडल अध्यक्षपदी धर्मेंद्र क्षीरसागर यांची निवड

0
249

पिंपरी,दि.४(पीसीबी) – शनिवार (दि.०१) रोजी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा पिंपरी -दापोडी मंडल अध्यक्षपदी धर्मेंद्र क्षीरसागर यांची निवड झाली. अध्यक्षपदाच्या निवडीचे नियुक्त पत्र मा.खासदार अमरदादा साबळे यांच्या हस्त्ते देण्यात आले.

यावेळी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाति मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराचे अध्यक्ष सुभाष भाऊ सरोदे , भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहराचे चिटणीस नेते विशाल वाळुंजकर, अनुसूचित मोर्चाचे यशवंत दनाने उपस्थित होते.

दरम्यान, पक्षाने दिलेली जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पडली जाईल याचा मला निश्तिच विश्वास आहे, सर्वांचं मी देलेल्या जबाबदारी आभार मानतो, असं भाजपा अनुसूचित जाती मोर्चा पिंपरी-दापोडी मंडल अध्यक्ष धर्मेंद्र क्षीरसागर यांनी म्हटलं आहे.