भाजपचे श्रीकांत भारतीय कोरोना पॉझिटिव्ह

0
252

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – भाजप सरकारच्या काळातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएस़डी आणि भाजपचे जेष्ठ नेते श्रीकांत भारतीय यांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले आहे.

राज्यातील पाच मंत्री कोरोनाची बाधा होऊन नंतर सुखरूप घरी परतले. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची बाधा झाल्याने रुग्णालयात दाखल केले. तत्पूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आरोग्य मंत्री श्रीपाद नाईक, कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा अशा विविध राजकीय पक्षांच्या खासदार, आमदारांना कोरोनाची बाधा झाली.

दरम्यान, श्रीकांत भारतीय यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी त्यांच्या हितचिंतकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.