भाजपचे ज्येष्ठ नेते मधु चव्हाण यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा

0
645

चिपळून, दि. २६ (पीसीबी) –  भाजपचे ज्येष्ठ नेते आणि म्हाडाचे अध्यक्ष मधु चव्हाण यांच्याविरोधात चिपळून पोलीस ठाण्यातमध्ये बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैक्षणिक संस्थेतील महिला कर्मचारीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप मधु चव्हाण यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पीडित महिलेने चिपळून पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मधु चव्हाण यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.