जिल्ह्यातून एक आमदार निवडून देणार, मग राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री कसा होणार? – अजित पवार

0
1156

औरंगाबाद, दि. २६ (पीसीबी) –  मुख्यमंत्री होण्यासाठी १४५ ची मॅजिक फिगर व्हावी लागते. तुम्ही तर जिल्ह्यातून  एक-एक आमदार निवडून देणार. मग राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री कसा होणार? असा सवाल करून विधानसभा आणि लोकसभा एकत्रित घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे गाफील न राहता तयारीला लागा, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना आज (बुधवार) येथे केले.  

औरंगाबाद येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस बुथ कमिटी सक्षमीकरण संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

अजित पवार पुढे म्हणाले की, नुसत्या घोषणा देऊन जमणार नाही, तर या सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून काम करावे लागेल. गावचा सरपंच तुमचा नाही, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, खासदार दुसऱ्या पक्षाचा आणि जिल्ह्यातून तुम्ही एक-एक आमदार निवडून देणार, मग राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री कसा होणार? असा सवाल त्यांनी यावेळी केला.