कासारसाई बलात्कार प्रकरण: गुरुवारी पिंपरीत कँडल मार्च आणि श्रद्धांजली सभेचे आयोजन

0
1557

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – कासारसाई येथील ऊसतोड कामगारांच्या दोन मुलींवर बलात्कार झाल्याने तसेच त्यातील एका मुलीचा मृत्यू झाल्याने आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी आणि मयत मुलीला श्रध्दांजली वाहण्यासठी गुरुवारी (दि. २७) सायंकाळी सहाच्या सुमारास पिंपरीत कँडल मार्च आणि श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

अत्याचार विरोधी कृती समिती पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने आणि शहरातील इतर सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने कँडल मार्च आणि श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या कँडल मार्चचा मार्ग पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथून गोकूळ हॉटेल, शगुन चौक, कराची चौक, रिव्हर रोड, झुलेलाल मंदिर येथील पवना घाट असा आहे. या कँडल मार्चला आणि पवना घाटावर आयोजित श्रद्धांजली सभेत नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.