भाजपची काँग्रेसच्या १० आमदारांना ५० कोटींची ऑफर; कमलनाथांचा खळबळजनक आरोप

0
458

भोपाळ, दि. २२ (पीसीबी) – काँग्रेसच्या १० आमदारांना प्रत्येकी ५०  कोटींची ऑफर देण्यात आली होती,  असा आरोप मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री  कमलनाथ यांनी केला आहे. यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेश सरकारला उलथून लावण्याचा भाजपचा डाव हाणून पडण्यासाठी काँग्रेस सज्ज  आहे, असे कमलनाथ म्हणाले.

काँग्रेसच्या १० आमदारांना आतापर्यंत भाजपकडून ५० कोटींची ऑफर देण्यात आली आहे,  असा आरोप कमलनाथ यांनी केला आहे.  मात्र,  आमचे आमदार विकले जाणार नाहीत,  असा दावा  कमलनाथ यांनी  करून भाजपचा काँग्रेस आमदारांना फोडण्याचा डाव उधळून लावू, असा इशारा दिला आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान रविवारी  झाल्यानंतर  मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार पाडण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मुख्यमंत्री कमलनाथ यांना पुन्हा बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान विरोधी पक्षनेते गोपाल भार्गव यांनी दिले आहे. याबाबत त्यांनी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणीही केली आहे.