भगवा रंग शौर्याचा, विजयाचा, त्यामुळे टीम इंडियाच्या जर्सीचा रंग योग्यच – रामदास आठवले

0
808

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – टीम इंडियाच्या भगव्या जर्सीवरून आता राजकारण पेटू लागले आहे. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी भगव्या जर्सीला विरोध दर्शवत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे केंद्रीय सामाजिक आणि न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी टीम इंडियाच्या भगव्या जर्सीला पाठिंबा दिला आहे. भगवा रंग हा बौद्ध धर्मातील भिख्खुंच्या वस्त्राचा आहे, भगवा रंग शौर्याचा आणि विजयाचा आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या जर्सीचा भगवा रंग हा योग्य आहे.

सध्या इंग्लंडमध्ये क्रिकेट वर्ल्डकप सुरु आहे. टीम इंडियाने आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. टीम इंडिया इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ भगवी जर्सी घालून मैदानात उतरण्याची शक्यता आहे. दोन्ही संघाच्या जर्सीचे रंग सारखेच असल्याने भारतीय भगवी जर्सी घालून खेळणार आहे.

यावरून अबू आझमी यांनी पंतप्रधान मोदींवर आरोप केले होते. ते म्हणाले होते की, मोदी सरकार देशाचे भगवीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहे. देशाचा विकास नाही, बेरोजगारी वाढत आहे. डॉलरचा भाव वाढत आहे, महागाई वाढत आहे. मात्र भारताच्या क्रिकेट संघाला भगवा रंग दिला जात आहे. त्याला तिरंग्याचा रंग द्यावयाला हवा, असे अबू आझमींनी नमूद केले.