बेडकाने कितीही फुगले, तरी बैल होत नाही; धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

0
497

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – बेडकाने कितीही फुगले, तरी बैल होत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर   पलटवार केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील टीकेला मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबईत मंगळवारी पार पडलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांना  टोला लगावताना  लोकसभेत ज्यांचे दोन अंकी खासदार निवडून येत नाहीत, ते पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत आहेत.  पंतप्रधानपदाची खुर्ची आहे की संगीत खुर्ची हेच कळत नाही, अशी सडकून टीका त्यांनी केली होती. या टीकेला धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मुंडे म्हणाले की, भाजपचे कधीकाळी दोन खासदार होते हे मुख्यमंत्र्यांनी विसरू नये. बेडकाने कितीही फुगले तरी बैल होत नाही. आगामी लोकसभेत महाराष्ट्रातून भाजपला दहा जागाही मिळणार नाहीत.  महाआघाडीचे नेत्तृत्व शरद पवार यांनी करावे, असे जनतेने ठरवले  आहे. आता याच जनतेने भाजपचे सरकार घालवायचे ठरवले आहे, असे मुंडे म्हणाले.