बेकायदेशीररित्या दारू विक्री करणा-या एकाला अटक

0
390

देहूरोड, दि. ४ (पीसीबी) – कायदेशीररित्या दारू विक्री करणा-या एकाला पिंपरी-चिंचवडच्या सामाजिक सुरक्षा पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून 41 हजार 930 रुपयांची दारू जप्त केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 2) सायंकाळी सहा वाजता समर्थनगर, देहूगाव येथे करण्यात आली आहे.

भीमा लिंगप्पा नायडू (वय 62, रा. समर्थनगर, माळवाडी, देहूगाव) असे अटक केलेल्या दारू विक्रेत्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई गणेश कारोटे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नायडू याने ग्राहकांना पत्र्याच्या शेडमध्ये बसण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. शेडमध्ये गर्दी जमवून मानवी सुरक्षितता धोक्यात येईल, तसेच कोरोना साथीच्या रोगाचा संसर्ग पसरविण्यासाठी पोषक वातावरण निर्माण केले. दारू विक्रीचा कोणताही परवाना नसताना नायडू याने दारू विक्री केली. याबाबत त्याच्यावर कारवाई करून त्याच्य्कडून 41 हजार 930 रुपयांचा दारूसाठ जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी नायडू याला अटक केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.