बेकायदेशीरपणे घरात घुसून मारहाण करत साहित्याची तोडफोड

0
263

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – रात्रीच्या वेळी चार जणांनी मिळून एका व्यक्तीच्या घरात बेकायदेशीरपणे गृह अतिक्रमण केले. त्यानंतर दोघांना बेदम मारहाण केली. घरातील सामान अस्ताव्यस्त टाकून फ्रिज आणि टीव्हीचे नुकसान केले. ही घटना शनिवारी (दि. 24) रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास निराधारनगर, भाटनगर समोर, पिंपरी येथे घडली.

इरफान शहानवाज शेख, आकाश राजू काळे, बाळा राजू काळे (तिघे रा. पत्राशेड पिंपरी), करण सरोदे (पुर्ण नाव पत्ता माहीती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सुरेश भुंगा कांबळे (वय 36, रा. निराधारनगर, भाटनगर समोर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास फिर्यादी जेवण करून घरी बसले होते. त्यावेळी आरोपी त्यांच्या घरात अनधिकृतपणे आले. आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली. घरातील सामान अस्ताव्यस्त टाकून फ्रीज व टीवी फेकून नुकसान केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.