बुरखा बंदीची मागणी शिवसेनेची नाही; संजय राऊतांचे घुमजाव

0
441

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – बुरखा बंदीची मागणी शिवसेनेची किंवा शिवसेना पक्ष प्रमुख  उद्धव ठाकरे यांची नाही, असा खुलासा  ‘सामना’चे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.  ‘मि. ओवेसी, घटना पुन्हा वाचा’या मथळ्याखालील रोखठोक या सदरात राऊत यांनी याबाबत स्पष्ट केले आहे.

बुरखाबंदीची जितकी चर्चा श्रीलंकेत झाली नाही, त्यापेक्षा जास्त चर्चा आपल्या देशात झाली. एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की, बुरखाबंदीची मागणी शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांनी केली नाही. श्रीलंकेतील घडामोडींवर एक विश्लेषण सामनाने छापले इतकाच हा विषय, असे स्पष्टीकरण राऊत यांनी दिले आहे.

दरम्यान, श्रीलंकेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर तेथे राष्ट्रीय सुरक्षेसाठी मुस्लिम महिलांना बुरखा घालण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर  ‘सामना’ मधून भारतातही बुरखा बंदी केली पाहिजे, असे मत व्यक्त केले होते. ‘रावणाच्या लंकेत घडले, रामाच्या अयोध्येत कधी घडणार?, अशा शिर्षकाखालील १ मेरोजीच्या अग्रलेखात  भारतातही ‘बुरखा’ तसेच ‘नकाब’ बंदी करावी, अशी मागणी  केली होती.