कासारवाडीत साडेपाच लाखांची घरफोडी; गुन्हा दाखल

0
555

कासारवाडी, दि. ५ (पीसीबी) – घर कुलुप लावून बंद असताना अज्ञात चोरट्यांनी कुलुप तोडून घरा प्रवेश करत कपाटत ठेवलेले ४ लाख ५५ हजारांचे १८.३ तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम १ लाख रुपये असा एकूण ५ लाख ५५ हजारांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना शुक्रवार (दि.३) रात्री दीड ते शनिवार (दि.४) सकाळी पाचच्या दरम्यान कासारवाडी शास्त्रीनगर येथील साईकृपा निवास येथे घडली.

याप्रकरणी संदिप मंगेश नाईक (वय ४३, रा. साईकृपा निवास, शास्त्रीनगर, कासारवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदिप यांचे कासारवाडीत साईकृपा निवास हे घर आहे. शुक्रवार (दि.३) रात्री दीड ते शनिवार (दि.४) सकाळी पाचच्या दरम्यान त्याचे कुलुप लावून बंद असताना अज्ञात चोरट्याने दरवाजाचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला. तसेच फिर्यादी यांच्या वडिलांच्या कपाटातील ४ लाख ५५ हजारांचे १८.३ तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम १ लाख रुपये असा एकूण ५ लाख ५५ हजारांचा ऐवज चोरुन नेला. सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.व्ही.गाडे चोरट्यांचा शोध घेत आहेत.